Ad will apear here
Next
‘एमसीई’ संस्थेतर्फे अभिवादन मिरवणूक
पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे आज (२८ नोव्हेंबर) महात्मा फुले पुण्यतिथीदिनी आझम कॅम्पस ते फुले वाडा अशी अभिवादन मिरवणूक काढली. या मिरवणुकीत अल्पसंख्यांक समाजातील पाच हजार विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी मिरवणुकीचे उद्घाटन केले. मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी केले. संस्थेच्या कला महाविद्यालयाने ​सादर केलेला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले अनाथ विद्यार्थ्यांना जेवण वाढताना​चा देखावा मिरवणुकीचे विशेष आकर्षण होता. मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या घोषवाक्यांचे फलक हाती धरले होते. ​​अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे ​१७​ वे वर्ष ​होते. ​​

दरबार ब्रास बँडची दोन पथके, ढोलताशा, तुतारी-नगारे ​यांच्या गजरात ​​आझम कॅम्पस​ येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. पूना कॉलेज, गोल्डन ज्युब्ली, टिंबर मार्केट, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, बब्बनमियाँ चौक, रिझवानी मशिद, मीठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा, चाँदतारा चौक​मार्गे ​घोषणांसह मिरवणूक महात्मा फुले वाडा येथे पोहोचली.​ ​​​‘एमसीई’चे मगदूम यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.

मिरवणुकीत ​डॉ. शैला बुटवाला, डॉ. रशीद शेख, डॉ. व्ही. एन. जगताप, डॉ. किरण भिसे, डॉ. भूषण पाटील, शाहिद इनामदार, वाहिद बियाबानी, शाहिद शेख, प्रा. इरफान शेख, प्रा. रबाब खान, मुमताज सय्यद, डॉ. आर. गणेसन, अ​जी​म गुडाखूवाला, प्राध्यापक, संस्थेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZONBI
Similar Posts
महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन मिरवणूक पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते होणार असून, संस्थेचे सचिव लतिफ मगदूम मिरवणूकीचे नेतृत्व करणार आहेत. अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १७वे वर्ष आहे
‘एमसीई’तर्फे गांधी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक पुणे : दीडशेव्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे गांधी जयंतीच्या पूर्वदिनी म्हणजेच एक ऑक्टोबरला अभिवादन मिरवणुकीचे आयोजन केले होते. यात ‘एमसीई’ सोसायटीतील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (एमसीई) स्पोकन इंग्लिश अ‍ॅकॅडमीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन झाले. आझम कॅम्पस येथे आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन बडोदा येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले
गाजलेल्या चित्रकारांची चित्रे झाली ‘जिवंत’ पुणे : गणपतराव म्हात्रे, पाब्लो पिकासो, एडवर्ड मूंच, वैन गो, साल्व्हादोर दाली, फ्रीडा काहलो, लिओनार्डो व्हिन्सी या चित्रकारांची पारंपरिक चित्रे प्रदर्शनात सजीव झाली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language